कुठलाच पक्ष स्वबळावर निवडणुका लढवू शकत नाही ही वस्तुस्थिती:विरोधी पक्ष नेते अजीत पवार


औरंगाबाद (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – ………सगळ्याच विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, महापालिकेच्या जागा एखादा पक्ष लढू शकतो का?सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता एकही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवू शकणार नाही. जर कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर ते फक्त कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठीच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांना सुनावले
कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वबळाची भाषा करावी लागते. आजच काॅंग्रेसच्या नेत्यांनी आपण राज्यात एवढ्याच जागा लढवणार असे जाहीर केले, तर इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते मग आम्हाला काय सतरंज्या उलचायला ठेवलंय का? असे विचारणार नाही का? त्यामुळे सगळ्यांच पक्षांना स्वबळाची भाषा करावी लागते.
नागपूर येथे झालेल्या बैठकीत स्वबळाचा नारा देण्यात आला, याकडे अजित पवारांचे पत्रकारांनी लक्ष वेधले. यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली राज्याची आजची परिस्थिती पाहता कुठलाच पक्ष स्वबळावर निवडणुका लढवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. काॅंग्रेसच्या बैठकीत जरी स्वबळाचा नारा देण्यात आला असेल तर शेवटी निर्णय त्यांच्या नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हेच घेणार आहेत.
अनेक ठिकाणी त्यांचे डिपाॅझीट जप्त होते. माझ्या बारामतीत मागे भाजपचे डिपाॅझीट जप्त झाले होते. तसेच राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांचे इतर ठिकाणी डिपाॅझीट जप्त झाले होते. त्यामुळे स्वबळाची भाषा कोणताही पक्ष करत असला तरी राष्ट्रवादी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवारसाहेबांना आहे,
शिवसेनेचे निर्णय उद्धव ठाकरे घेतात, तसं काॅंग्रेसबाबत सोनिया गांधी याच अंतिम निर्णय घेणार आहे.एकदा या प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतला, की त्याची अंमलबजावणी खाली आपल्याला करावी लागते. त्यामुळे स्वबळाची भाषा किंवा तयारी ही कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरण्यासाठी केली जाते, आम्ही तसेच करतो. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.