डॉ नीला गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी…

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या मूळच्या पुण्यातील वकील डॉ. नीला गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे.ॲड. डॉ. गोखले या मूळच्या पुण्यातील आहेत. त्यांची उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून झालेली शिफारस पुणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. ॲड. गोखले यांनी सात वर्षे येथील जिल्हा व कौटुंबिक न्यायालयासह विविध प्राधिकरणांत प्रॅक्टिस केली आहे

ॲड. डॉ. गोखले यांनी १९९५ मध्ये इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये १९९७ साली एलएलएमची पदवी घेतली.झाशीच्या बुंदेलखंड विद्यापीठातून त्यांनी दत्तक घेण्याचे सामान्य कायद्यांबाबत पीएचडी केली आहे

. त्यांचे पती कर्नल केदार गोखले हे लष्करी क्षेत्रात कार्यरत आहे. तर मुले प्रीती, प्रिया आणि ईशान ही विधीचे शिक्षण घेत आहेतॲड.डॉ. गोखले यांनी अनेक वर्षे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दत्तक घेण्याच्या क्षेत्रात तसेच कुसुमबाई मोतीचंद महिला सेवा ग्रामसारख्या अनेक संस्थांत विधी विषयक काम केले आहे.

सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयांसमोर दिवाणी, फौजदारी आणि घटनात्मक स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी युक्तिवाद केला आहे.पक्षपाती तरतुदींना आव्हान देणे, विशेषाधिकारांचे कोडिफिकेशन मिळविण्याची कार्यवाही अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी इच्छुक व्यक्तींच्या नावाने जनहित याचिका दाखल केल्या आहेत

. युनियन ऑफ इंडिया, इंद्रप्रस्थ गॅस लि., पाटणा युनिव्हर्सिटी यांच्या पॅनेलसह केंद्र सरकारच्यावतीने निवडलेल्या वकिलांच्या पॅनेल-अ मध्ये कार्यरत होत्यासर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व इतर चार ज्येष्ठ न्यायाधीश असे एकूण पाच सदस्यांनी मिळून तयार झालेले हे एक निवड मंडळ आहे.

हे मंडळ उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करते. या मंडळाची बैठक बोलावली जाते व या न्यायाधीशमंडळतर्फे या निवडी व नेमणुका, बदल्या केल्या जातात. हे मंडळ हा न्यायाधीशांची नावे सुचविते आणि तशी निवड यादीची शिफारस केंद्र सरकारकडे करते

Latest News