संदीप वाघेरेआयोजित मोफत आयोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद


श्री. संदीप वाघेरेआयोजित मोफत आयोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद.
पिंपरी प्रतिनिधी :- कै. सौ. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ श्री. संदीप वाघेरे व लोकमान्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन पिंपरी येथे करण्यात आले होते.
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि. कै. सौ. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी वाघेरे गाव येथे करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये हाडांच्या वरील उपचार व शस्त्रक्रिया, लिगामेंट रिकन्ट्रक्शन, मणक्यावरील उपचार व शस्त्रक्रिया, हृदयाचे आजार व शस्त्रक्रिया, पोटाचे आजार व शस्त्रक्रिया, किडनी स्टोन वरील उपचार व शस्त्रक्रिया, जनरल मेडीसीन ( ब्लड प्रेशर, डायबेटीस, थायरॉईड ) इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
सदर शिबिराचा १७० नागरीकांनी लाभ घेतला. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व श्री. संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सवलतीच्या दरात व गरजू गरीब रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सदर शिबिराचे नियोजन सचिन वाघेरे, शुभम शिंदे, विठ्ठल जाधव, रोहन वाधवानी, रंजनाताई जाधव, अश्विनी लोहार, अपूर्वा खोचाडे, दीपक मनेरे यांनी केले. तसेच लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. अर्चना कुडे व डॉ. आशुतोष दुबे व सहकारी यांचे सहकार्य लाभले.