महाराष्ट्र एक प्रो इंडस्ट्री, प्रो डेव्हलेपमेंट राज्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई: दावोस येथील हा दौरा अत्यंत यशस्वी झाला असून महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने जगभरातील देशांच्या प्रतिनिधींशी महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यात महाराष्ट्राला काय मिळालं ते म्हणाले, ‘ दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये राज्याच्या वतीने मी उपस्थित होतो. उद्योगमंत्री आणि संबंधित विभागही होता. दावोस दौऱ्याबद्दल खूप आनंदी, समाधानी आहे. दौऱ्याचं फलित झालंय, ते यासाठी की राज्यासाठी 1 लाख 37 हजार कोटींचे एमओयू झाले आहेत.महाराष्ट्र सरकारवर त्यांनी विश्वास दाखवला. सध्या झालेल्या करारांतून एक लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होतील. ज्यांना मी भेटलोय, ते मुंबईत येऊन एमओयू साइन करणार आहेत. या दोन दिवसातही एमओयू होतील. खऱ्या अर्थाने राज्यासाठी ही मोठी अचिव्हमेंट आपल्याला पहायला मिळतेय, असे मुख्यमंत्री म्हणाले
.महाराष्ट्र हे एक प्रो इंडस्ट्री, प्रो डेव्हलेपमेंट राज्य आहे. इथे गुंतवणूक करण्यासाठी आम्ही हमी दिली आहे. जगातील उद्योगांना इथे रेड कार्पेट घातलं जाईल, अशी हमी आम्ही या जागतिक परिषदेत देऊन आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जगभरातले विविध देशातले लोक त्या ठिकाणी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमवर छाप पहायला मिळाली.
भारतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची सर्वांना इच्छा होती. विविध देशाच्या लोकांना मी भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. काही देशांचे मंत्री, काही प्रधानमंत्रीही होते. सिंगापूर, सौदी इतर देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली.त्यांना आवर्जून महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली.
विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. विमानतळावर उतरल्यानंतर हार, पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं.
राज्यासाठी ही मोठी अचिव्हमेंट आहे. विविध सेक्टरमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली. या दौऱ्यात नुसते करार झालेले नाहीत तर या एमओयूची अंमलबजावणी होणार आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.या करारांमध्ये हाय टेक इन्फ्रास्ट्रक्टरसाठी 54 हजार कोटी, एनर्जी सेक्टरमध्ये 46,800 कोटी, आयटी डेटा सेंटरमध्ये 32 हजार कोटी तर स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 22 हजार कोटींचे तसेच अॅग्रो आणि फूड प्रोसेसिंगमध्ये 2 हजार कोटींचे एमओयू झाले. याचा फायदा राज्याला, तरुणाईला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवला.