चिंचवड विधानसभा, आश्विनी ताई जगताप यांना उमेदवारी दिली तर पोटनिवडणूक बिनविरोध भाजप मधील एका गटाचा दावा


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप तथा भाऊ यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तेथे भाऊंच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी मिळाली, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्याला चिंचवडमधील भाजपच्या एका गटाने दुजोरा दिला
-पतीच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत पत्नीला उमेदवारी दिली, तर विजय मिळतो, अन्यथा पराभव पदरी येतो, हा इतिहास आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच २०२२ ला झालेल्या अंधेरी (पूर्व) मुंबईच्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (बाळासाहेब उद्धव ठाकरे) ऋतुजा लटके या विजयी झाल्या. त्यांचे पती रमेश लटके हे या मतदारसंघाचे आमदार होते
तर, त्याउलट अनुभव पंढरपूर-मंगळवेढ्यात त्याअगोदर आलेला आहे. तेथेभारत भालके यांची पुण्याई त्यांचे पूत्र भगिरथ यांच्या कामी आली नाही आणि समाधान आवताडे यांनी २०२१ च्या पोटनिवडणुकीत बाजी मारली होती. हा अनुभव जमेस धरून चिंचवडला अश्वनी यांना उमेदवारी मिळेल, असा अंदाज आहे
दरम्यान, अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली, तर विरोधी पक्ष सुद्धा उमेदवार देण्याची शक्यता नाही. जरी त्यांनी तो दिला, तरी अश्विनीताईंसाठी संपूर्ण भाजप एकजुटीने विजयासाठी प्रयत्न करेल, असे भाजपच्या चिंचवडमधील दुसऱ्या गटातून सांगण्यात आले. १४ असंतुष्ट नगरसेवकांचा हा गट राज्यातील सत्तांतरापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार होता. त्याची चाहूल देवेंद्र फडणवीसांना लागताच त्यांनी हे पक्षांतर रोखले होते
. अश्विनी यांना उमेदवारी दिली, तर काम करू, असे या गटातील एका नाराज नगरसेवकाने सांगितले. तसं झालं, तर चिंचवडमधून जगतापांचा चौकार बसणार आहे.कारण हवेली या राज्याच्या सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ ला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या नव्या तीन मतदारसंघाची निर्मिती झाली. तेथील लक्ष्मण जगताप हे पहिले आमदार ठरले.
त्यांनी २००९ ला अपक्ष म्हणून बाजी मारली. तर, त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून ते विजयी होत आमदारकीची त्यांनी हॅटट्रिक केली होती.त्यामुळे, जर त्यांच्या कुटुंबातील कोणी, यावेळी विजयी झाले, तर तो या कुटुंबाचा आमदारकीचा चौकार बसणार आहे. तसेच, जर, अश्विनी जगताप उमेदवार असतील, तर ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते. तसे झाले, तर या मतदारसंघात प्रथमच बिनविरोध निवडणुकीचाही इतिहास तथा विक्रम होणार आहे
मात्र, भाऊंच्या पत्नी उमेदवार नसतील, तर मात्र भाजपला चिंचवडमध्ये विजयासाठी झुंजावे लागेल. कारण तेथील पक्षातील असंतुष्ट गट त्या स्थितीत प्रचार न करता शांत बसण्याची शक्यता आहे. गतवेळी २०१९ ला लक्ष्मण जगतापांना आघाडीतील राष्ट्रवादीचा उमेदवार प्रतिस्पर्धी नसतानाही अपक्ष शिवसेना बंडखोर राहूल कलाटे यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.यावेळी, तर मातब्बर भाऊच उमेदवार नाहीत. दुसरीकडे अनेक तालेवार इच्छूक असून त्यातील एकाने, तर सोशल मिडियात आताच रणशिंगही फुंकले आहे.
इच्छुकांची संख्या मोठी!चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मागील 15 दिवसापूर्वी निधन झाले. त्यांच्या जागी होणारी निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छूकांनी सोशलमीडियाद्वारे प्रचार ही सुरु केल्याचे दिसत आहे तर अनेकांची नावे चर्चिली जात आहेत. त्यामध्ये सर्वात आघाडीवर दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांचे नाव घेतले जात असून शंकर जगताप यांचे नाव दुसया क्रमांकाने घेतले जात आहे. राष्ट्रवादी कडून ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे तसेच भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनीही तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.
अश्विनीताई उमेदवार…!दिवगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या कुटुंबातील दोन नावापैकी निकटवर्तीय चाहत्याकडून अश्विनीताई जगताप यांना पहिलीपसंती दिली जात असून त्या उमेदवार असतील तरसहानुभूती म्हणून विरोधी पक्षाकडून उमेदवार उभा केला जाणार नसून त्या बिनविरोध निवडून येतील असा अंदाज बांधला जात आहे आणि भाजप तर्फे जर दुसरा कोणीही उमेदवार दिल्यास त्याच्या विरोधी लढण्यासाठी अनेकांनी तयारी केल्याचे सांगितले जाते.