चिंचवड विधानसभा, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरच आम्ही निवडणूक लढवणार: विरोधी पक्ष नेते अजीत पवार

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – )चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. या मतदारसंघातल्या बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ही पोट निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.

कसबा विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची सर्वाधिक ताकद आहे त्या पक्षाला ती जागा मिळावी, अशी आमची भूमिका आहे.

महाविकास आघाडीत कसबा विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. त्या जागेवर काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे. पण याच माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक ताकद असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत पवार यांनी कसबा विधानसभा मतदारसंघावर देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगितला आहे

भारतीय जनता पक्ष या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार देईल, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

Latest News