पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार लढविणार- छाया सोळंके-जगदाळे


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झालेली आहे. या पोटनिवडणुकीत पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार देवून निवडणुक लढविणार आहे. याकरिता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणवासी तसेच इतर भागातील मतदाराबरोबरच शहरातील स्थानिक पण, राजकारणात अद्यापही वंचित राहिलेल्या घटकांची मोट बांधणार आहे. अशी माहिती अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी दिली.
– पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. शहरात राज्याच्या कानाकोप-यातून कामगार, मजूरासह अनेक नागरिक स्थायिक झाले आहेत. शहरात कोणतीही निवडणुका आल्या की, गाववाले आणि बाहेरवाले हा मुद्दा निघतोच, त्यामुळे बाहेरवाल्यांचा शिक्का पुसला जात नाही. शहरात वावरताना, उदयोग व्यावसाय करत असताना अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
खऱ्या आर्थाने जर पाहिले, तर या वर्गातील 95 टक्के नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वर्गातील अनेकांना आपल्या रोजगाराची शाश्वत खात्री नाही, उद्योग-व्यावासायाला संरक्षण नाही. यामुळे या घटकातील अनेकांची आर्थिक परस्थितीत ढासळली असून झोपडपट्टींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या शहरातील बहुतांश जणांनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून शहरात आलेल्या लोकांना स्विकारले असले, तरी अनेक जणांना मात्र अजूनही साप्तनिक पणाची वागणूक मिळत आहे.
निवडणुक लढवणे हा प्रत्येक व्यक्ती आणि मतदाराचा संविधनात्मक मुलभूत अधिकार आहे. लोकशाहीचे संवर्धन व प्रसार अबाधित ठेवण्याचे महत्वाचे साधन आहे. या दृष्टीकोनातून आम्ही या पोटनिवडणुकीकडे पाहत आहोत.
या निवडणुकीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या मागे हजारो संख्येने असलेली गुप्त ताकद व अदृश्य शक्ती पिंपरी चिंचवड शहराला पाहायला मिळेल. भविष्यात या ताकदीचा उपयोग शहरातील सर्वच घटकांच्या न्याय हक्कांसाठी निश्चितपणे केला जाणार आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवाराचा चेहरा आम्ही लवकरच शहरापुढे उभा करु.
यासाठी शहरातील सत्तेचा, सामाजिक घटकांचा, प्रादेशीक घटकाचा समतोल राखण्यासाठी आणि यातुन या शहराला खऱ्या आर्थाने परिवर्तनाच्या वाटेवर नेहण्यासाठी पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे
. ही आघाडी वंचितांची, शोषीतांची आणि कष्टकऱ्यांची नवी आशा म्हणून या शहरात कार्यरत राहणार आहे. यातुनच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढील निवडणुकीत या शहरात महत्वाची भुमिका बजावत लोककल्याण आणि कार्यासाठी सज्ज असणार आहे, असेही छाया सोळंके-जगदाळे यांनी म्हटले आहे.