कसबापेठ मेधा कुलकर्णी, स्वरदा बापट, शैलेश टिळक भाजपाला उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचे देणार कुणाला?


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी घरातील एकाला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यांचा निर्णय अंतिम असेल, असंही ते म्हणाले. कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकीट न दिल्यास कॉंग्रेस रोहित टिळक यांना उमेदवारी देऊ शकते. माजी उपमहापौर दीपक मानकर यांची भूमिका निर्णयांक ठरणार आहे . राष्ट्रवादीच्या वतीने रुपाली पाटील यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.तर , शिवसेनेकडून विशाल धनवडे निवडणूक लढवू शकतात असे दिसते आहे. भाजपा ने जर स्वरदा बापट किंवा मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली तरच कसब्यातील विधानसभेची निवडणूक बिनविरोध होईल असे म्हणणे काही राजकीय समीक्षकांनी मांडले आहे .पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूकित भाजपाला उमेदवारी देताना कसरत करावी लागेल असे दिसते आहे, हेमंत रासने यांना स्थायी समिती अध्यक्षपद सलग दिल्याने त्यांना उमेदवारी मिळेल याबाबत शक्यता नसल्याचे सांगितले जाते आहे.गणेश बिडकर यांना नियोजन मंडळात सामावून घेण्यात आले आहे ,धीरज घाटे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची शक्यता कमी वर्तविली जात असताना आता कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.आणि खासदार गिरीश बापट यांच्या घरातील त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांना ही उमेदवारी दिली पाहिजे असाही प्रवाह आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी खासदारकीचे उमेदवार अशी गणना होणारे नेते प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते आहे.मुक्ता टिळकांच्या निधनामुळे त्यांच्याच घरातील कोणाला उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपा राष्ट्रवादीने केल्यास तो यशस्वी होऊ द्यायचा नाही असा प्रयत्न होण्याची जास्त शक्यता आहे. बापटांच्या सुनबाई स्वरदा यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी ,शिवसेना आणि कदाचित कॉंग्रेस देखील हि निवडणूक बिनविरोध करण्यास फारसा विरोध करणार नाही असे सांगितले जाते आहे.हेच मत मेधा कुलकर्णी यांच्याबत देखील मांडले जाते आहे. मात्र अन्य कोणीही उमेदवार भाजपाने दिल्यास हि निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगिले जाते आहे.स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी सर्वात प्रथम हि निवडणूक बिनविरोध करण्यास पुढाकार घेऊ शकते असेही म्हटले जाते आहे. खासदार गिरीश बापट यांच्या सह योगेश गोगावले,सुहास कुलकर्णी,उज्वल केसकर,विकास मठकरी अशा अनेक नेत्यांची ,कार्यकर्त्यांची जुनी फळी भाजपात कायम आहे ,कसब्यातून बापटांचा पाठींबा मिळवूनच टिळक विजयी झाल्या होत्या. अलीकडच्या राजकारणात भाजपा जुनी फळी नामशेष करत असल्याची अधून मधून कुजबुज होते .भाजपाची जुनी फळी डावलणे आता यापुढील राजकारणात परवडणारे नाही असाही मतप्रवाह आहे.