चिंचवड आणि कसबा विधानसभा बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांना विनंती करणार :पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाच सामना ) उमेदवार कोण असावा हे आम्ही नव्हे तर कोअर कमिटी ठरवते.दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप  यांच्या कुटुंबात दुमत असण्याचे कारण नाही. बिनविरोध होण्यासाठी आम्ही सर्वच राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, यांना भेटून विनंती करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपा संपर्क प्रमुख मुरलीधर मोहोळ, इच्छुक  शंकर जगताप ,अश्विनी जगताप,रिपाइंच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे ,उपस्थित होत्या.

   पाटील म्हणाले की , लक्ष्मण जगताप हे केवळ आमदार नव्हते. ते पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल केला आहे. दि. २७ फेब्रुवारी ऐवजी दि. २६ फेब्रुवारीला करण्याचे निश्चित करण्यात आले. 

भाजपाने गाफील न राहता तयारी करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. शक्ती केंद्र आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याकडे आहे.

 याठिकाणी जगताप कुटुंबियांमधूनच उमेदवार दिला जाईल, यात शंका नाही. मात्र, त्याबाबत भाजपाच्या पक्षशिस्तीप्रमाणे प्रदेश कोअर कमिटी निर्णय घेत असते. आम्ही संभाव्य उमेदवारांची नावे कोअर कमिटीकडे पाठवली आहेत, असेही पाटील म्हणाले.

Latest News