हात से हात जोडो अभियान शहरात यशस्वी करणार – चंद्रशेखर जाधव


हात से हात जोडो अभियान शहरात यशस्वी करणार – चंद्रशेखर जाधव
पिंपरी, पुणे (दि. 26 जानेवारी 2023) खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानामुळे देशभरातील युवकांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पासून हात से हात जोडो अभियान सुरू होत आहे. हे अभियान पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शंभर टक्के यशस्वी करणार आहेत.
याद्वारे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन खा. राहुल गांधी यांचे पत्र नागरिकांना द्यावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले.पिंपरी काळेवाडी येथे पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या झेंडावंदन कार्यक्रमात जाधव बोलत होते.
यावेळी काळेवाडी पिंपरी येथील युवा कलाकार व टिफिन टाईम या मराठी चित्रपटातील मुख्य भूमिका केलेली प्रज्ञा फडतरे हिच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सज्जी वर्की, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गौरव चौधरी, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जमीर शेख, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, शहर सोशल मीडिया समन्वयक जय ठोंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी टिफिन टाईम या मराठी चित्रपटातील मुख्य भूमिका केलेली प्रज्ञा फडतरे हिचा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले आणि चंद्रशेखर जाधव यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत सज्जी वर्की यांनी केले. सूत्र संचालन गौरव चौधरी यांनी केले आणि आभार जय ठोंबरे यांनी मानले…………………………………..