अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

IMG-20230127-WA0013

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी, प्रतिनिधी : 

 जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन आणि अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभातफेरी, नृत्य, समूहगीत, देशभक्तीपर गीत, विद्यार्थ्यांची भाषणे, मानवी मनोरे आदी उपक्रम यावेळी घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी नृत्य, समूहगीत, देशभक्तीपर गीत, भाषण,मानवी मनोरे सादर केले. प्रजासत्ताकाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहाने प्रजासत्ताक दिन सोहळ्यास रंगत आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
           कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. अतुल शितोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. आरती राव म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नीलम मेमाणे यांनी, तर ज्योती मोरे यांनी आभार मानले. 

Latest News