आम्हाला सल्ला देणारे राऊत कोण आहेत? प्रकाश आंबेडकर

पुणे (ऑनलाईन परिवर्तनांचा सामना ) – खासदार संजय राऊत (यांनी प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांविषयी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही हे स्पष्ट केलं होतं. पण पवार हे राज्यातच नाही तर देशातलं एक उत्तुंग नेते आहेत. तसेच, ते देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना, त्याचे स्तंभ हे शरद पवार आहेत.
सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत, राऊत म्हणाले होते’महाविकास आघाडीचा (MVA) भाग होण्याची प्रक्रिया सुरु असताना त्याचे स्तंभ शरद पवार यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे. मतभेद असले तरी त्यांच्याविषयी बोलताना आदर ठेवायला पाहिजे, असा सल्लाही राऊतांनी आंबेडकरांना दिला आहे
यावर आंबेडकर यांनी एका वाक्यात राऊतांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.आंबेडकर म्हणाले, ‘मला हा सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला असता, तर तो मी मानला असता. पण, कोण संजय राऊत कोण? आम्हाला सल्ला देणारे राऊत कोण आहेत? असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना डिवचले आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन यांची युतीची घोषणा झाली. उद्धव ठाकरे ठाकरे गट प्रमुख आणि वंचितचे अध्यक्षप्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत, ही युती जाहीर केली होती. एकिकडे ठाकरेंची शिवसेना आणि वंचित हे जवळ येत असताना आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे निष्ठावान नेते अन् धडाडणारे तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊतांवर मात्र टीका केली आहे
. यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘शरद पवार हे आजही भाजप सोबतच आहेत, असं विधान करुन आंबेडकरांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी आंबेडकरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता
. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही आंबेडकरांना याबाबत सबुरीचा सल्ला दिला होता यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती आकाराला येत असताना सुरूवातीलाच असे मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. यामुळे आता शिवसेना – वंचित युतीच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.