भाजपनं मनुस्मृती सोडली आणि घटनेनुसार काम करायला लागले तर आम्ही भाजपसोबतही जाऊ…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनांचा सामना) – आमचा लढा हा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. जर भाजपनं मनुस्मृती सोडली आणि घटनेनुसार काम करायला लागले तर आम्ही भाजपसोबतही जाऊ, असं मत माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यावेळी व्यक्त केले आहे

जो बदल सरदार पटेल यांनी केला तो भाजपनं मनानं स्विकारावा. मग भाजप आमचा शत्रू राहणार नाही.बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी युती जाहीर केली. परंतु प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारां बाबत केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे

.या वादामुळं प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषेद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी आंबेडकर म्हणाले की, कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नसतात. सगळेच भारतीय पक्ष आहेत परंतु राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात. आमच्यात आणि भाजपमध्येही टोकाचे मतभेद आहेत. याआधीही आमच्यातील मतभेद समोर आले आहेत,

Latest News