राज्यातील कायदा-सुवस्था राखता येत नसेल तर गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा:खा सुप्रिया सुळे

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. गृहमंत्र्यालयाचे हे अपयश आहे. राज्यातील कायदा-सुवस्था राखता येत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,” “शिंदे-फडणवीस सरकारला ईडी (ED) सरकार म्हटलेलं आवडते,” असा टोला सुळे यांनी यावेळी लगावला
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज सभा होत आहे, हे चांगलं आहे. सभा घेण्याचा अधिकार संविधानमध्ये सगळ्यांना आहे,”कसबा पोटनिवडणकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. पण या परिसरात भाजपचे झेंडे लागले आहे, यामुळे भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे
, “भाजपने कसब्यात आचारसंहितेचा भंग केला याचे मला आश्चर्य वाटत नाही, कारण हे सरकार नियमाने चालत नाही कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येईल
राज्यात सध्या गुन्हेगारी वाढत आहे. दौंडमध्ये एकाच कुंटुबातील सात जणांची हत्या, पुण्यातील कोयता गँग, राज्यात महिलांवर सातत्याने होत असलेले अत्याचार, या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं,
“महागाई आणि बेरोजगारीवर सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कारण या सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे. ED म्हणजे नक्की एकनाथ, देवेंद्र का की आणखी काही,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला