शैलेश टिळक यांचा कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज…….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – सर्वच पक्षातून उमेदवा मिळण्यासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू आहेअसे असतानाच आज मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे कडून शैलेश टिळक हेच उमेदवार असण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून सोळा तर राष्ट्रवादीकडून बाराजण इच्छुक आहेत. तसेच ही निवडणूक मनसे देखील लढविण्याची शक्यता आहे. तर याच पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच इच्छुकांची नावे वरिष्ठाकडे पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले

. मात्र, अद्याप कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्याठी सर्व पक्षातील नेत्यांसह अनेक कार्यकर्तेही इच्छुक आहेत

Latest News