चिंचवड विधानसभा,भाजपा एबी फॉर्म कुणाला? शंकर जगताप कीं आश्विनी जगताप

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या पाठोपाठ बंधू, शंकर जगतापांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे

. भाजपाकडून दोघांची नावे उमेदवारीसाठी पुढे येत होती. आज मात्र दोघांनी भाजपाच्या नावाने उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने एकच चर्चा शहरात सुरू आहे. भाजपा कोणाला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार जाहीर करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

 विधान परिषद निवडणुकीत जय-पराजयाचा धुरळा उडत असतानाचपोटनिवडणुकांच्या (By Election) पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडआणि कसबा पेठनिवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजप असा तगडा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे

. या दोन पोट निवडणुकांसाठी भाजपचा उमेदवार नेमका कोण असेल यावरून नवा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडच्या जागेवर निवडणूक होत आहे. या ठिकाणी जगताप यांचे भाऊ आणि पत्नी या दोघांनीही उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. आता भाजप नेमकी कुणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरु आहे.

Latest News