215 कसब्याचे दोन्हीही उमेदवार दोघेही कोट्याधीश…..


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – हेमंत यांनी स्वतः दोन कोटी ६७ लाख ५९ हजार ९२ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे एक कोटी ८१ लाख १४ हजार ४९५ रुपयांची आहे. मुलीच्या नावे ४३ लाख २५ हजारांची तर मुलाच्या नावे १ कोटी ३३ लाख ५९ हजार ५३३ रुपयांची स्थावर मत्ता आहे. तसेच त्यांनी काही जागेवर २ लाख ५६ हजारांचे बांधकाम केलं आहे. रवींद्र धंगेकर यांची ८२ लाख २७ हजार २१ रुपयांची स्वयंसंपादीत स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीने एक कोटी पाच लाख ९६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता खरेदी केली. धंगेकर यांना १० कोटी ५३ लाख सहा हजार ३३५ रुपयांची वारसाहक्काने स्थावर मालमत्ता मिळालेली आहे.हेमंत रासने यांच्यावर तीन कोटी ५५ लाख ६३ हजार ४१४ रुपयांचे कर्ज तर पत्नीच्या नावे २४ लाख ९३ हजार २६३ रुपयांचे कर्ज आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर ३५ लाख ७३ हजार १९२ रुपयांचे, तर त्यांच्या पत्नीवर ३२ लाख ८ हजार ७७८ रुपयांचे कर्ज आहे. कसबा पोटनिवडणुकीचं आता वातावरण तापलं आहे. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीबाबत शपथपत्रंही सोबत जोडले होते.त्यात त्यांच्या रोख रक्कम, स्थावर मालमत्तेसह कर्जाचाही तपसील दिला आहे. त्यानुसार भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची एकूण १७ कोटींची तर काँग्रसचे रवींद्र धंगेकर यांची पत्नीसह १४ कोटी ८३ लाख ९७ हजार ९५७ रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यावर ३५ लाख हेमंत रासने यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे २०२२-२३ चे उत्पन्न पाच लाख ७५ हजार ४१० रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीचे चार लाख ३० हजार ८३० रुपये, तर मुलाचे तीन लाख १७ हजार ४३० रुपये वार्षिक उत्पन्न आहे. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे तीन लाख ३६ हजार ९४० रुपये तर त्यांच्या पत्नीचे तीन लाख ९८ हजार ४०० रुपयांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील उत्पन्न आहे हेमंत रासने यांची जंगममालमत्ता ही एक कोटी ८२ लाख ८१ हजार ३६२ तर पत्नीच्या नावे २७ लाख ५९ लाख ३५७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मुलीच्या नावे आठ हजार ४२३ तर मुलाच्या नावे दोन लाख ७७ हजार ५७८ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रवींद्र धंगेकर यांच्या नावे ४७ लाख ६ हजार १२८ रुपयांची जंगममत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६८ लाख ६७ हजार ३७६ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.