चिंचवड विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या नावाची घोषणा

चिंचवड,(ऑनलाईन परिवर्तनचा सामना )- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांना जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करून ही माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.

Latest News