‘तुलिका’ कला प्रदर्शन संपन्न

cb39d235-f262-4c65-8dd3-eac2fb0e8a63

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणे, दि. 19 – चेतन प्रकाश आणि नितीन हेरेकर या चित्रकारांचे ‘तुलिका’ या गेली 3 दिवस सुरू असलेल्या कला प्रदर्शनाचा आज समारोप झाला. दर्पण आर्ट गॅलरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकार आणि शिल्पकार सचिन खरात यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी खासदार वंदनाताई चव्हाण, कुशल व्यंगचित्रकार आणि गुंतागुंतीच्या लाकडी कलेतील आंतरराष्ट्रीय कलाकार चारुहास पंडित तसेच पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल उपस्थित होते. उद्घाटनावेळी खरात व पंडित यांनी सुंदर चित्रे रेखाटून उपस्थितांना वेगळाच आनंद दिला.
या कला प्रदर्शनातील या दोन भिन्न कलाकारांच्या वेगवेगळ्या कला, रंगांचे फटकारे यांच्या शैलींना रसिकांची चांगली पसंदी मिळाली. प्रदर्शनातील चित्रे जिवंत, सुंदर कलाकृती पहायला मिळाल्याच्या अनेक चित्रकारांच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर चित्रांची विक्री देखील झाली तर अनेकांनी विविध ऑर्डर्स देखील दिल्या आहेत. उद्घाटनावेळी बोलतांना वंदनाताई चव्हाण म्हणाल्या की, कलेचा पाठपुरावा करणे हे ध्यानासारखे आहे, जिथे आपण वेळ आणि जागेचे भान गमावून बसतो आणि आपण आपल्या आत्म्याशी एकरूप होतो. चेतन प्रकाश आणि नितीन हेरेकर यांची चित्रे सकारात्मक विचार आणि आशावादाचे प्रकटीकरण करणारी आहेत. यावेळी सचिन खरात म्हणाले की, हेरेकर हे
व्यावसायिक कलाकार असून विविध विषयांना अगदी सहजतेने हाताळतात, त्यांची चित्रे आनंद देणारी असतात.

Latest News