शिवसेनेत बंडखोरी झाली ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळेच- चंद्रशेखर बावनकुळे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – शरद पवारांना मुख्यमंत्री व्हावे असं कधीही वाटत नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राचे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजप राज्यात मोठा पक्ष झाला. कारण 124 नंतर 105 आमदार फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडून आले. पण राष्ट्रवादीला 70 आमदार देखील निवडून आणता आले नाहीत”, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला”आज खोके-खोके करता पण त्यावेळी तुम्ही मंत्रालयात बसले असता तर आज ही वेळ आली नसती. हे मंत्रालयात बसायचे पण आदित्य ठाकरे यांनी असे का नाही केले. ते तर फक्त उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फिरायचे. त्यांनी सरकारही फेसबुकवर चालवलं. आताही ते फेसबुकवर बोलतात. पण त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे त्यांच्याकडे चारच लोकं राहतील”, असा टोला बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावला. ”शिवसेनेत बंडखोरी झाली ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळेच. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांना त्यांच्या मुलाला मंत्री करायचे होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी, काँग्रेसबरोबर गेले. पण तिकडे गेले तरीही त्यांनी मंत्र्यांना, आमदारांना वेळ दिला नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे पुढच्या आठ महिन्यात फक्त चारच लोक राहतील”, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला आहे.चंद्रशेखर बावनकुळे हे ‘साम टीव्ही’च्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना फक्त चारच लोकं राहतील, असा दावा त्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.बावनकुळे म्हणाले, ”शिंदे आणि आमची युती नैसर्गिक आहे. यांनी पवारांच्या ट्रॅपमध्ये येऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यांच्या मुलाला मंत्री केलं, पण हे सर्व निसर्गाला मान्य नव्हतं. सध्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विकास होतो आहे. महाविकास आघाडीच्या काळात फक्त सत्ता आणि पैसे, पैसे आणि सत्ता हेच धोरण त्यांचं होतं”, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर प्रहार केला