भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होतीनिवडणूक अधिकाऱ्यांनी विश्रामबाग गुन्हा दाखल केला आहे. आता रासने यांच्यावर काय कारवाई होते, हे लवकरच कळेल. रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहेकसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक मतदानात काल (रविवारी) भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते, याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कसब्यात भाजप, काँग्रेससह इतर पक्षांसह अपक्ष असे १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के, 11 वाजेपर्यंत 8.25 टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत 18.5 टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत 30.5 टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाले होतेकसबा (Kasba) विधानसभा मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदार संघात दोन लाख 75 हजार 428 मतदार आहेत. कसब्यात 2009 मध्ये 49.7 टक्के, 2014 मध्ये 61.57 टक्के, तर 2019 मध्ये 51.62 टक्के मतदान झाले होते.कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. मतदार यादीत नाव नसल्याने काही ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. निकाल २ मार्चला आहे.