दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे डॉ. सुजीत शिंदे यांचे प्रात्यक्षिक

IMG-20230303-WA0038

दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे डॉ. सुजीत शिंदे यांचे प्रात्यक्षिक

आंतरराष्ट्रीय सुश्रूती परिषदेमध्ये डॉ. शिंदे यांचा सन्मान

पुणे, प्रतिनिधी :
पुण्यातील सर्जन डॉ. सुजीत शिंदे यांनी नवीन पिढीतील डॉक्टरांना फायदा व्हावा, या उद्देशाने दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक दिले. या नावीन्यपूर्ण माहितीबद्दल नागपूर येथे झालेल्या निमा ओबीजीवाय सोसायटी सेंट्रल आणि दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्तपणे आयोजित सुश्रूती – २०२३ या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक परिषदेमध्ये डॉ. शिंदे यांना गौरविण्यात आले.
               तीन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून आयुर्वेदिक प्रैक्टिशनर्सनी आपला सहभाग नोंदवला होता. विविध विषयावर चर्चा, वर्कशॉप्स आणि तज्ज्ञ  डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रिया अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेली ही भारतातली पहिलीच आंतराष्ट्रीय परिषद होती. यामध्ये डॉ. सुजीत शिंदे यांनी नवीन पिढीतल्या डॉक्टरांना फायदा व्हावा, या उद्देशाने दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक दिले व नवीन तरुण डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
           गेल्या अनेक वर्षांपासून डॉ शिंदे हे त्यांच्या पुणे येथे वारजेस्थित मातृछाया नर्सिंग होमद्वारे रुग्णांची सेवा करत आहेत. एक विकसित आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी आजाराचे योग्य निदान करून ऍलोपॅथी, तसेच आयुर्वेद याचा गरजेप्रमाणे व योग्य पद्धतीने वापर करून रुग्णांना लवकरात लवकर कसे बरे करता येईल, याचा विचार सर्व डॉक्टरांनी  करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.