मेंटल कॉर्नर फुले नगर येरवडा मागासवर्गीय वस्ती हटवू नये,दलित पँथर, रिपब्लिकन ऑफ इंडिया यांच्या वतीने, धरणे आंदोलन


मेंटल कॉर्नर फुले नगर येरवडा मागासवर्गीय वस्ती हटवू नये म्हणून दलित पँथर वा रिपब्लिकन ऑफ इंडिया यांच्या वतीने,एक दिवसीय धरणे आंदोलन
पुणे ( परिवर्तनाच सामना ) मेंटल कॉर्नर फुले नगर येरवडा मागासवर्गीय वस्ती हटवू नये म्हणून दलित पँथर वा रिपब्लिकन ऑफ इंडिया यांच्या वतीने,एक दिवसीय धरणे आंदोलन आज करण्यात आले
येरवडा विश्रांतवाडी येथील स.नं ९५/२/अ, बाल्मिकी वसाहत मेंटल कॉर्नर फुलेनगर, येरवडा, पुणे- ४११००६ सदर वस्ती ही अनूसूचित जाती जमाती व सर्व गोरगरीब पारधी, मेहतर, महार तसेच मुस्लिम व उत्तरप्रदेशी अशी हातावर पोट असणारे रोजदारी वर काम करणारे गरीब मागासवर्गीय गरजु लोक राहात असून त्याच जागेवर SRA करून देण्यात यावे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले
१२ वी व १० वीच्या बोर्डाचे पेपर चालु असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या महिन्यामध्ये आपण यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मेटलचे अधीक्षक, पुणे मनपा ने आयुक्त व आपले जिल्हाधिकारी असे एक सर्कल मिटींग बोलावून यात या गरिबांचे पुनर्वसन करावे गेली ५० वर्षे ही संघटना व पक्ष समाजातील तळागाळातील जनतेसाठी आहोरात्र जगडत आहेत. तरी यांना न्याय देण्यासाठी उतरून न्याय देत आहे. यांना यांच्या हक्काचे घर मिळालेच अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनातं करण्यात आली
या वेळेस दलित पँथर चे अध्यक्ष यशवंत नडगम पुणे शहराध्यक्षा आकाश पायळ माजी महापौर सुनीता वाडेकर माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे पुणे शराध्यक्ष शैलेश चव्हाण युवक अध्यक्ष निलेश आल्हाटसनी कोरे वाल्मिकी समाज उपस्तिथ होते
गेली ३५ ते ४० वर्षापासून ही लोक राहत आहेत त्यामुळे यांची अचानक यांची घरे तोडून यांना बेघर करू नये अन्यथा दलित पँथर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महाराष्ट्रभर तीव्र प्रकारचे आंदोलन करील यात जर काय अनूचित प्रकार घडला तर याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी