फागुन उत्सव ‘ नृत्याविष्काराला चांगला प्रतिसाद…..


‘ फागुन उत्सव ‘ नृत्याविष्काराला चांगला प्रतिसाद…..
………..पुणे ःहोळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘ फागुन उत्सव ‘ या नृत्याविष्काराला शुक्रवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.’कथक केंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डान्स(नवी दिल्ली)’ यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते. ‘
भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत डॉ.नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी च्या सहकार्याने हा नृत्याविष्कार सादर करण्यात आले .कथक केंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डान्स ‘च्या संचालक प्रणामी भगवती, अध्यक्ष उमा डोग्रा, पं. नंदकिशोर कपोते, नंदकुमार काकिर्डे, शमा भाटे या नृत्याविष्कार कार्यक्रमाला उपस्थित होते.

शुक्रवार , ३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.गौरी दिवाकर,शर्वरी जमेनीस,अदिती फणसे,सरिता काळे यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले . रसिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. शर्वरी जमेनीस यांनी कृष्णवंदना आणि ताल प्रस्तुत केले. चैतन्य कुंटे यांची ‘ होरी ‘ ही रचनाही त्यांनी सादर केली.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. हा १५३ वा कार्यक्रम असून विनामूल्य होता