भक्ती-शक्ती शिल्प समूहाजवळील जागा PMRD कडून पालिकिने ताब्यात घ्यावी :सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

: भक्ती-शक्ती शिल्प समूहाजवळील निगडी ठाणे समोरील जागा पी एम आर डी ए कडून पालिकेच्या ताब्यात घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती शिल्पसमूहलगत सालाबाद प्रमाणे यावर्षी थाटामाटात मोठ्या उत्साहमध्ये शिवजन्मोत्सव साजरा झाला.१९ फेब्रुवारी२०२३रोजी सात-आठ हजार लोकांच्या उपस्थितीत “शिवगर्जना” या महानाट्याच्या प्रयोगाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाची सुरुवात होण्याअगोदर आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या लोकांचे सत्कार करण्यात आले. भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आपल्या प्रस्ताविकामध्ये समितीच्या वतीने मारुती भापकर यांनी हा महानाटयाचा प्रयोग सुरू आहे ती हि जागा पी एम आर डी ए प्रशासनाने विकली आहे, अशी आम्हाला माहिती मिळालेली असून आपण आयुक्त म्हणून ही जागा पीएमआरडीए कडून ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावा. मूळ मालकालाही त्याचा योग्य मोबदला मिळावा.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली

या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भव्य,दिव्य “शिवसृष्टी” या ठिकाणी उभारावी. ही आमची समितीच्या वतीने मागणी आहे. या मागणीला दोन हात वर करून मान्यता द्यावी असे आवाहन भापकर यांनी उपस्थित श्रोत्यांना केले असता उपस्थित श्रोत्यांनी टाळ्याच्या गजरात या मागणीचे स्वागत करून दोन्ही हात वर करून या मागणीला पाठिंबा व्यक्त केला.

जर ही आमची मागणी मान्य झाली नाही तर प्रसंगी आम्हाला पिंपरी चिंचवडकर शिवप्रेमीं जनतेला एकत्रित करून आंदोलन करावे लागेल. असा इशारा पीएमआरडीए प्रशासनाला भापकर यांनी जाहिर या कार्यक्रमात दिला.

यावर आपण आयुक्त म्हणून या जागे बाबत समितीच्या वतीने करण्यात आलेली मागणी हि मागणी योग्य व बरोबर असून यातील तांत्रिक व कायदेशीर बाबी तपासून शासनाकडे योग्य पाठपुरावा करून आम्ही सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे जाहीर रित्या आश्वासन याच जाहीर कार्यक्रमात दिले.

या विषयावर सकारात्मक कार्यवाही होण्यासाठी योग्य ते पाऊले उचलावेत आशयाचे निवेदन आम्ही आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन दिले.यावेळी मारुती भापकर, सचिन चिखले, उत्तम केंदळे,प्रकाश जाधव,जीवन बोराडे,सागर तापकीर आदि उपस्थित होते.

यावर आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हि जागा ताब्यात घेण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील असे सिंह यांनी आश्वासन दिले

Latest News