आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा….

मुंबई | ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांनी दमदाटी करणे आणि सरकारी कामांत अडथळा आणणे, या दोन कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे.एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.अपंगाच्या मागण्या मांडत असताना बच्चू कडू आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी बच्चू कडू यांनी आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केलायाप्रकरणी 2017 साली बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. अखेर या प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिलाय