बचत ते गुंतवणूक ‘ विषयावर महिलांना मार्गदर्शन,..ब्राह्मण महासंघ चा महिला मेळावा संपन्न

‘ बचत ते गुंतवणूक ‘ विषयावर महिलांना मार्गदर्शन………..ब्राह्मण महासंघ चा महिला मेळावा संपन्न

पुणे :ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडी ने जागतिक महिला दिनानिमित्त ‘ बचत ते गुंतवणूक ‘ या विषयावर चार्टर्ड अकाऊंटंट सच्चीदानंद रानडे यांचे व्याख्यान महिला वर्गासाठी आयोजित केले होते.या प्रसंगी यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आलामहासंघ च्या संलग्न संस्थांची या प्रसंगी माहिती देण्यात आली

विश्वस्त सौ श्वेता कुलकर्णी, महिला आघाडी च्या प्रदेश कार्याध्यक्ष सौ तृप्ती तारे, सौ विद्या घटवाई, युवती अध्यक्ष सौ रुपाली जोशी, मैत्रेयी पतसंस्था च्या अध्यक्ष सौ लता दवे, ‘देसी ‘ संस्थेच्या अध्यक्ष सौ अर्चना मराठे ,महिला पुरोहित सौ नीलिमा पारखी , सौ जयश्री जोशी, पार्श्वगायिका सौ नयना देशपांडे यांच्यासहित शेकडो महिला या प्रसंगी उपस्थित होत्या.महासंघाचे महिला संघटन प्रचंड मोठे असून त्यात रोजच महिला वाढत आहेत.

‘पतसंस्था असो की ग्राहक भांडार किंवा सर्व संलग्न संस्था यात महिला उत्तम कार्य करत असून अगदी रस्त्यावर येऊन आक्रमक पणा दाखवण्यात सुद्धा ही आघाडी सक्रिय असते याचा सर्वांनाच अभिमान असल्याचे या वेळेस विद्या घटवाई आणि नीलिमा पारखी यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदान आणि श्रीसूक्त पठण ने झाली