PUNE: रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना ED कडून अटक 

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना ( Vinay Aranha) यांना अटक केली आहे. न्यायालयाने विनय आर्‍हाना यांना 20 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. आर्‍हानांच्या अटकेमुळेशिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.पीएमएलएच्या तरतुदीनुसार नोंदवलेल्या जबाबांसह तपासाचा मोठ्या नोंदी मनी लॉन्ड्रिंगच्या गंभीर गुन्हयात आर्‍हानाचा सहभाग दर्शवित असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. ईडीने आर्‍हानाच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आर्‍हानाला 10 दिवसांची कोठडी दिली आहे.

कॉसमॉस बँकेकडून (Cosmos Bank) आर्‍हानाने चुकीच्या पध्दतीने कर्ज घेतले. शाळांच्या नुतणीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाव्दारे मिळालेल्या पैशाचा उपयोग आर्‍हानाने हायफाय लाईफस्टाईल साठी केला.

तसेच बॉलीवूडमधील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे अंमलबजावणी संचालनायाकडून सुरू असलेला तपासात या बाबी समोर आल्याची माहिती आहे

. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाइी आर्‍हानाची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. ईडीने अटक करून आर्‍हानाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

Latest News