इएसआयसी उपप्रादेशिक कार्यालयात महिला दिन व विशेष सेवा पंधरवडा उत्साहात साजरा


इएसआयसी उपप्रादेशिक कार्यालयात महिला दिन व विशेष सेवा पंधरवडा उत्साहात साजरा.
पुणे (परिवर्तनाच सामना ) कामगार राज्य विमा महामंडळाच्या(इएसआयसी) बिबवेवाडी येथील उपप्रादेशिक कार्यालयामध्ये दिनांक 08/03/2023 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यालयात 1 मार्च ते 8 मार्च दरम्यान एक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.या सप्ताहात महिलांसाठी विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर व सेमिनार चे आयोजन करण्यात आले. या वर्षी महिला दिवसासाठी #EmbraceEquity ही थीम निर्धारित करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय महिला दिवसा निमित्त आयोजित समारंभाला अध्यक्ष म्हणून कार्यालय प्रमुख उप संचालक (प्रभारी) श्री हेमंत कुमार पाण्डेय उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला मुख्य अतीथि म्हणून कोथरुड, पुणे येथील सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती रुक्मिणी गलंडे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा सुभारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. त्यानंतर कार्यालय प्रमुख श्री पाण्डेय यांनी मुख्य अतीथिंचे शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.या प्रसंगी श्रीमती संगीता खांदवे यांनी एका मार्मिक कवितेचे वाचन केले.
उप संचालक राजेश सिंह यांनी सांगितले की , स्त्री कुठल्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. ती आपल्या जीवनात एक आई, बहीन,मुलगी, पत्नी म्हणून महत्वपूर्ण असते. स्त्रियांच्या प्रति आपला व्यवहार संवेदनशील असला पाहिजे. तसेच स्त्रीयांना समाजात सुरक्षित व सन्मानपूर्वक राहता यावे यासाठी मुलींपेक्षा जास्त मुलांवर संस्कार करण्याची आवश्यकता आहे
.प्रमुख अतीथि श्रीमती रुक्मिणी गलंडे यांनी आपले अनुभव सांगताना महिलांना कठिन परिस्थितिमध्ये सुद्धा न डगमगता कार्य करण्यासाठी प्रेरित केले.त्यांनी महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.तसेच एकतेचे महत्व सांगतानाच कोणत्याही परिस्थितिमध्ये एकोप्याने राहण्याचे आवाहन केले.
कार्यालय प्रमुख पाण्डेय यांनी सांगितले की , आपल्या संस्कृतीत महिलांना विशेष असे स्थान आहे.त्यांनी सांगितले की शक्ति प्राप्त होत नाही तर ती अधिग्रहित केली जाते. शक्तिचे अधिग्रहण करण्यासाठी आपल्या अधिकारांविषयी जागृत असने आवश्यक असते. म्हणून स्त्रियांनी आपले अधिकार व ताकद यांविषयी जागृत असले पाहिजे.
जर आपण आपल्या परिवारातील मुलांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली तर स्त्री-पुरुष समानतेचे ध्येय साध्य होईल असे त्यांनी सांगितले.याशिवाय कार्यालयात दिनांक 24 फेब्रुवारी पासून 10 मार्च पर्यंत इएसआयसी विशेष सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे.
त्या अंतर्गत 8 मार्च रोजी इएसआय योजने अंतर्गत मिळणारे हितलाभ व इएसआयसीची कार्यप्रणाली यावर विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कार्यालय प्रमुख उप संचालक (प्रभारी) श्री हेमंत कुमार पाण्डेय, उप संचालक श्री राजेश सिंह, सहाय्यक संचालक श्री चन्दन प्रभाकर यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या शंका व समस्यांचे निवारण केले.