गाणाऱ्या व्हायोलिनने घडवला ‘ देवाचिया गावा ‘ चा लडिवाळ प्रवास !व्हायोलिन वादनातून फुलला भक्तीचा मळा


गाणाऱ्या व्हायोलिनने घडवला ‘ देवाचिया गावा ‘ चा लडिवाळ प्रवास !*…………………*व्हायोलिन वादनातून फुलला भक्तीचा मळा ! _व्हायोलिन वरील संत रचनांच्या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद_———–‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘जाऊ देवाचिया गावा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हायोलिनवर संतरचनांचे बहारदार सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले.
रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत, गाणाऱ्या व्हायोलिन ने घडवलेला ‘ देवाचिया गावा ‘ चा लडिवाळ प्रवास अनुभवला. या कार्यक्रमातील सर्व संतरचना व्हायोलिनवर अनुप कुलथे यांनी सादर केल्या. या व्हायोलिन वादनातून जणू भक्तीचा मळाच फुलला ! कार्यक्रमाची संकल्पना डॉ वंदना बोकील-कुलकर्णी यांची होती.
त्यांनीच सर्व प्रासादिक रचनांचे उत्कट शब्दात निरुपण केले.रविवार , १९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.रोशन चांदगुडे (तबला),प्रणय सकपाळ (पखवाज),चंद्रकांत चित्ते(की- बोर्ड ),धनंजय साळुंके (ताल वाद्य ) यांनी साथसंगत केली.
कलादिग्दर्शन कपिल जगताप यांचे होते. मोगरा फुलला(संत ज्ञानेश्वर), तीर्थ विठ्ठल -क्षेत्र विठ्ठल( संत नामदेव ), भेटीलागी जीवा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी( संत तुकाराम ), आता कोठे धावे मन(संत तुकाराम), माझे माहेर पंढरी (संत एकनाथ) अशा अनेक प्रासादिक रचना अनुप यांनी बहारदार पणे सादर केल्या.
‘ ‘अवघा रंग एक झाला ‘(संत सोयराबाई) यांच्या रचनेने समारोप झाला. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५४ वा कार्यक्रम होता