कोण बनणार सुपर सिंगर ‘ करावके गीत गायन स्पर्धा—मुखडा आणि अंतरा गाऊन बना ‘सुपर सिंगर ‘!

‘कोण बनणार सुपर सिंगर ‘ करावके गीत गायन स्पर्धा* —-मुखडा आणि अंतरा गाऊन बना ‘सुपर सिंगर ‘!

पुणे : ‘हार्मनी इव्हेंट ‘ या संस्थेतर्फे ‘कोण बनणार सुपर सिंगर करावके गीत गायन स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आली आहे.

दि १८ आणि १९ एप्रिल रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन(वानवडी), पुणे येथे ही स्पर्धा होणार आहे . नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी ९८२२७०९७३०,९८५०७१८२०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवोदित -हौशी,व्यावसायिक गायकांना संधी देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वय वर्ष २५ पर्यंत ,वय वर्ष ५० पर्यंत ,वय वर्ष ५१ च्या पुढे आणि व्यावसायिक असे चार गट असणार आहेत

.स्पर्धेआधी गायकांना आपला करावके ट्रॅक संस्थेकडे पाठवायचा आहे.विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती आरती दीक्षित यांनी पत्रकाद्वारे दिली

Latest News