श्री रामनवमी उत्सवात पं.समीर दुबळे यांचे बहारदार गायन!तुळशीबागेतील कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद


श्री रामनवमी उत्सवात पं.समीर दुबळे यांचे बहारदार गायन !
………………
तुळशीबागेतील कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
पुणे :
श्री रामजी संस्थान (तुळशीबाग) यांच्या वतीने आयोजित श्री रामनवमी उत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या संध्येला पं.समीर दुबळे यांनी बहारदार शास्त्रीय गायन केले . रात्री ८.३० ते १० दरम्यान हे गायन झाले. त्यांनी बागेश्री रागाने सुरवात केली आणि रंगत गेलेल्या गायकीने रसिकांना रिझवले.त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके,हार्मोनियम वर अदिती गराडे,पखवाज वर आकाश तुपे यांनी वाद्यांची साथसंगत केली. निलेश धाक्रस,मृदुला तांबे,रविराज काळे यांनी गायनाची साथ दिली.
चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध अष्टमी दरम्यान दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आजच्या गायन कार्यक्रमाला रसिकांची चांगली उपस्थिती होती.