देशात अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )-

भाजपच कायम सुडाचे राजकारण करीत आले आहे. राहुल गांधींवरील कारवाईही त्याचेच एक उदाहण आहे. ही कारवाई करून देशात अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न केला आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींना, काँग्रेसला देशात प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर टीका केली आहे. या कारवाईमुळे  भाजप किती घाबरले आहेत हे दिसून येत आहे.

केंब्रीजमध्ये काय बोलले याचा काही संबंध नाही. त्यांची खासदारकी रद्द करण्याचा भाजपचा प्रयत्न अनेक वर्षांपासूनचा आहे तर नरेंद्र मोदींनी चीनमध्ये भारताबद्दल जे वक्तव्य केले होते, त्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई करणार. असा प्रति प्रश्न त्यांनी केला

महागाई, बरोजगारीमुळे मोंदीवरोधात वातावरण निर्मिती होत आहे. संसदेतील गांधींचा आवाज बंद करण्यासाठी ही शिक्षा झाली आहे.चव्हाण यांनी या कारवाईचा आणि राहुल गांधी यांच्या केंब्रीज विद्यापीठातील वक्तव्यांचा काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले.

, “राहुलजींनी देशाबाहेर केलेल्या विधानांचा आता काही संबंध नाही. त्या देशात फ्रीडम ऑफ स्पीच आहे. त्यांना आपल्या देशातील परिस्थिती सांगण्यासाठीच बोलाविले होते. तेथे ते खोटी स्थिती कशी सांगतील.

Latest News