भारतीय विद्या भवनमध्ये ३० मार्च रोजी ‘ कीर्तन संवाद ‘ कार्यक्रम

IMG-20230327-WA0030

भारतीय विद्या भवनमध्ये ३० मार्च रोजी ‘ कीर्तन संवाद ‘ कार्यक्रम*

——————————–*श्रीराम नवमी,रामदास जयंतीनिमित्त आयोजन*———–‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कीर्तन संवाद ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार , ३० मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मधुश्री शेंडे आणि अवनी परांजपे हे बाल कीर्तनकार श्रीराम नवमी,रामदास जयंतीनिमित्त कीर्तन संवाद सादर करणार आहेत. श्रीमती अंजली कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून आशुतोष परांजपे(हार्मोनियम),केदार तळणीकर(तबला) हे साथसंगत करणार आहेत. ‘

भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५६ वा कार्यक्रम आहे

Latest News