Pune: खडकी एलफिस्टन रोड वरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहने व तीन चाकी वाहनांना जाण्यास परवानगी..

पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -आज (बुधवारी) जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा पायी आढावा आ.शिरोळे यांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतला व स्थानिक नागरिकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे खडकी भागात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर येणाऱ्या अडथळ्यांची पाहणी करून ते अडथळे दूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आ.शिरोळे यांनी सविस्तर चर्चा केली.या पाहणी दरम्यान वाहतूक पोलीस उपआयुक्त विजय मगर, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी गोंजारे, अजित देशमुख, प्रतिभा पाटील, माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पुणे मेट्रोचे अधिकारी, तसेच भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.खडकी एलफिस्टन रोड वरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहने व तीन चाकी वाहनांना जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्या (गुरुवार) पासून होणार आहे.यामुळे खडकी भागातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटेल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.पुढील सात दिवसांमध्ये निरीक्षण करून जर वाहतूक व्यवस्थित सुरु राहिली तर छोट्या चार चाकी गाड्यांना सुद्धा परवानगी देण्याचा विचार होईल, असेही आ.शिरोळे यांनी सांगितले.

Latest News