पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘तेर एन्व्हायरॉथॉन २०२३’ चे आयोजन

*पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी* *’तेर एन्व्हायरॉथॉन २०२३’ चे आयोजन

*पुणे: ‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या संस्थेच्या वतीने ‘तेर एन्व्हायरॉथॉन २०२३ ‘ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व स्तरावर लोकांना संवेदनशील करण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा होत आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे दिली.

यंदाचे हे एन्व्हायरॉथॉनचे दुसरे वर्ष असून याच वर्षी जागतिक पर्यावरण दिनाला ५० वर्षे होत आहे. त्यानिमित्त या दिनाच्या एक दिवस आधी संस्थेने ही एन्व्हायरॉथॉन आयोजित केली आहे. ग्लोबल नेचर फंड चे थीस ग्रीट्झ, विलो ‘ संस्थेच्या इव्हा होट्च हे जर्मनीचे पाहुणे खास करून उपस्थित राहणार आहेत.

तसेच पर्यावरण आणि ‘बीट प्लास्टिक पॉल्युशन’ अर्थात प्लॅस्टिक प्रदूषण रोखणे हा याचा उद्देश आहे. ‘सर्वांसाठी धावा, पर्यावरणासाठी धावा’ ही या एन्व्हायरॉथॉन ची संकल्पना आहे.

गेल्या वर्षी या मॅरेथॉनमध्ये पुण्यासह राज्यातील विविध भागातून ,विविध वयोगटातील सुमारे १००० व्यक्तींनी सहभाग घेतला होता. यंदा ही मॅरेथॉन ४ जून रोजी पाषाण येथील पुणे ग्रामीण पोलिस हॉकी मैदान येथे सकाळी पाच ते दहा या वेळेत होणार आहे

.पुणे ग्रामीण पोलिसांचे सहकार्य देखील या उपक्रमाला मिळाले आहे.मॅरेथॉन ३, ५ आणि १० किलोमीटर अशा स्वरूपात होणार असून त्यामध्ये १२ ते १८ वर्षे, १९ ते ४० वर्षे, ४१ ते ५५ आणि ५६ वर्षे व त्या पुढे अशा विविध वयोगटानुसार मॅरेथॉनमध्ये सहभाग घेता येणार आहे.

१० किलोमीटर गटातील विजेत्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र असून ५, ३ किलोमीटर गटातील विजेत्याना बक्षीसे,प्रमाणपत्र दिले जाणार आहे.नाव नोंदणीसाठी ९८३४३०५१२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा terre.envirothon@gmail.com या ईमेलवर करावी ,असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest News