अजित पवार म्हणाले की, राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे, याचा विचार जनतेने केला पाहिजे.


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
तडीपार गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यावरून पुण्यात भाजपवर टीका होत आहे. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोमणा लगावला आहेअजित पवार म्हणाले की, राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे, याचा विचार जनतेने केला पाहिजे. सत्ताधारी काय पद्धतीने वागत आहेत. लोकशाहीत कुठल्या पक्षाने कुणाला प्रवेश द्यावा, हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे का? एकदा माझ्याकडूनही एक गोष्ट घडली होती. मला त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नव्हती. पण, ते लक्षात आल्यानंतर आम्ही लगेच पुढची कार्यवाही संबंधित व्यक्तीबद्दल केली हेाती पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला भाजपत प्रवेश देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचार केला असेल, अभ्यास केला असेल शिवाय माहितीही घेतली असेल, त्यामुळे त्या प्रवेशाबाबत पाटील यांनी बोलणे योग्य ठरेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवारयांनी पाटील यांना टोला लगावला.चंद्रकांत पाटील आपले पालकमंत्री आहेत.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. अनुभवी नेते आहे. एका जबाबदार पक्षाचे अनेक वर्षे प्रांताध्यक्ष होते. त्यांनी या सर्व गोष्टी करतानाच विचार केला असेल. अभ्यास केला असेल, माहिती घेतली असेल. त्यामुळे मोहोळ याच्या पत्नीच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनीच उत्तर दिलेले चांगलं. पण, जनतेनेही या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, असे आवाहनही पवार यांनी केलेकाही वर्षांपूर्वी कुख्यात गुंड बाबा बोडके यालाही अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीवर राजकारणाचे गुन्हेगारी होत असल्याबद्दल जोरदार टीका झाली होती. त्यानंतर अवघ्या एकाच दिवसांत बोडके याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली हेाती. तीच आठवण आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.