पंचकन्या : एक नृत्यकथी’ कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

IMG-20230422-WA0017

‘पंचकन्या : एक नृत्यकथी’ कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘पंचकन्या : एक नृत्यकथी’ ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.शनीवार, २२ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.

शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा कार्यक्रम ‘नुपूर नाद ‘ तर्फे प्रस्तुत केला गेला. हा संवाद नृत्याच्या या अभिनव कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यकलाकार डॉ.स्वाती दैठणकर यांनी सोलो प्रकारात स्वरचित हिंदी कविता म्हणत नृत्य सादर केले. भारतीय परंपरेतील अहिल्या,सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी या पंचकन्यांवर आधारित या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.अहिल्या, सीता ,तारा, द्रौपदी, मंदोदरी या जर आजच्या काळात आल्या, तर त्या स्वतः विषयी आणि आजच्या स्त्री विषयी काय बोलतील, असा या नृत्यकथीचा विषय होता.

डॉ. स्वाती दैठणकर यांच्या शिष्यानी याच कार्यक्रमात समूह नृत्य रचना सादर केल्या. त्यात गणेश वंदना, नरसिंह कृती आणि तिल्लाना यांचा समावेश होता.प्रास्ताविक भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६१ वा कार्यक्रम होता .

Latest News