बारामतीत कालिचरण महाराजा वर गुन्हा दाखल…


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) बारामती शहरातील तीन हत्ती चौकात कालिचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल वादग्रस्त वक्तव्ये करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार बारामती पोलीस स्टेशनं मध्ये करण्यात आली आहे
शहरात 9 फेब्रुवारी रोजी आयोजित हिंदू गर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. बांदलवाडी, ता. बारामती) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोर्चाचे आयोजन करण्यापूर्वी विकास देवकाते यांना पोलिसांनी जमावबंदी लागू असल्याने अटीचे उल्लंघन करू नये, अशी नोटीस दिली होती.
. मात्र पोलिसांनी इतक्या उशीरा हा गुन्हा कसा दाखल केला या बद्दल शहरात चर्चा सुरु आहे.
भारतीय दंडविधान कलम 153 अ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी अतुल जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केले आहे की, बारामतीत 9 फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चा झाला होता. या मोर्चाची व्हिडिओ क्लिप पोलिसांनी बारकाईने पाहिली, या क्लिपमध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले