आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार – शरद पवार

 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन पार पडत आहे. यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.तसेच यावेळी राष्ट्रवादीचे काही नेते रडल्याचेही पाहायला मिळाले. तसेच यावेळी धनंजय मुंडे हे पवार साहेबांच्या पाया पडल्याचेही पहायला मिळाले.कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्रू अनावर झाले. तसेच पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे.आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केलीराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे काही नेते रडल्याचेही पाहायला मिळाले. तसेच यावेळी धनंजय मुंडे हे पवार साहेबांच्या पाया पडल्याचेही पहायला मिळाले.

अशी घोषणा मुंबईतील वाय. बी. सेंटरमधील लोक माझे सांगाती-भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. त्याचे पडसाद तत्काळ सभागृहातच उमटले, त्याचबरोबर राज्यभर उमटत आहेत. बुलडाणा आणि धाराशिवच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहेबुलडाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी आणि धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जोपर्यंत पवारसाहेब आपला राजीनामा मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचा राजीनामा मागे घेणार नाही, अशी घोषणाही या दोघांनी केली आहे. राज्यभरातील कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. तेही पवारांनी राजीनामा मागे घ्यावेत, अशी मागणी करत आहेत

लोक माझे सांगाती भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होतो आहेात, अशी घोषणा केली. त्यानंतर सभागृहातच एकच गोंधळ सुरू झाला. शरद पवार यांच्या जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अश्रू अनावर झाले होते. अख्ख भाषण त्यांनी रडतच केलेतुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्वजण राजीनामे देतो, अशी घोषणाच जयंत पाटील यांनी केली. अनेक नेत्यांनी पवारांना निर्णय मागे घेण्याचे साकडे घेतले. सभागृहातील सर्वजण रडत होते, अनेकजण त्यांच्या जिंदाबादची घोषणा करत होते. सुमारे दोन ते तीन तास वाय. बी. सेंटरमध्ये हा प्रकार सुरू होता. दुसरीकडे राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी आमदार, खासदारांकडे याबाबतची विचारणा फोनवरून करत आहेतधाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिजरादार आणि बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष काझी यांनीही आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेतात की आपल्या निर्णयावर ठाम राहतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Latest News