माझा निर्णय मी दिला मात्र, फेरविचार करायला दोन दिवस द्या :- शरद पवार

मुंबई :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – )

आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली

. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर आले.दरम्यान, जोपर्यंत पवारसाहेब आपला निर्णय बदलणार नाहीत तोपर्यंत आम्ही अन्नपाण्याशिवाय आंदोलन करणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाय.बी. चव्हाण सेंटर परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते

निर्णय जाहीर केल्यानंतर आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. मात्र कार्यकर्त्यांनी अन्नपाण्याशिवाय आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांची कार्यकर्त्यांप्रति असलेली भावना आंदोलकांपर्यंत पोहचवली. खासदार सुळे यांनी फोनवरून पवार आणि आंदोलन कार्यकर्त्यांचा संवाद घडवून आणला. त्यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांनी माघार घेण्याची तयारी दाखविली नाही

सिल्व्हर ओकवर पावर, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री भुजबळ, आमदारयांच्याशी चर्चा केली. तसेच कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखून आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी गेले पाहिजे, अशी अट ठेवली.

त्यांचे म्हणणे कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी अजित पवार, खासदार सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार हे पुन्हा आंदोलकांकडे आले. त्यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांचा निरोप सांगितला पवार सांहेबांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी हट्टीपणा केलेला चलणार नाही. त्यांच्यापेक्षा मी जास्त हट्टी आहे. माझा निर्णय मी दिलेला आहे. मात्र, आता मला फेरविचार करायला दोन ते तीन दिवस लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आता कुणीही उपाशी राहू नये. त्यानंतर सर्वांनी आपापल्या घरी जावे, अशी विनंती पावरसाहेबांनी केली आहे.”

शरद पवारांच्या या आवाहनास प्रतिसाद देत आंदोलक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते आंदोलन स्थळावरून उठले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

Latest News