शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाका, अन्यथा कारवाईला सामोरे जा…

google Photos

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) –

महापालिकेने अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात ९६० होर्डिंग काढले आहेत. उर्वरित होर्डिंग ३१ मे पर्यंत काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिका खडबडून जागी झाली आहे. शहरात अधिकृत, अनधिकृत असे तब्बल ३९०० होर्डिंग असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेने अधिकृत होर्डिंग व्यावसायिकांनी त्यांचे होर्डिंग सुरक्षित आहे की नाही याची तपासणी करून पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करा अन्यथा होर्डिंग अनधिकृत ठरविले जाईल, अशा इशारा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी लेखी आदेशाद्वारे दिला आहे

महापालिकेने सार या कंपनीकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करून घेतले. त्याचप्रमाणे परवाना निरीक्षकांनीही अनधिकृत होर्डिंग शोधून काढले होते. त्यामध्ये २ हजार ६११ होर्डिंग अनधिकृत आढळून आले.

यामध्ये नगर रस्ता, हडपसर-मुंढवा, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता या भागांत सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग उभे असल्याचे दिसून आले आहे.आकाशचिन्ह विभागाने होर्डिंग काढून टाकण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून दोन ठेकेदार नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून ही कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात ९५० अनधिकृत होर्डिंग महापालिकेने काढून टाकले,

पण अजूनही शहरात ८०० अनधिकृत होर्डिंग उभे आहेत.शहरात गेल्या दीड वर्षांपासून अनधिकृत होर्डिंग पाडून टाकण्याची कारवाई सुरू आहे.

पण यामध्ये वेळकाढूपणा होत असल्याने ते अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या व्यावसायिकांना फायदेशीर ठरत आहे. हे निदर्शनास आल्याने आता ३१ मे पर्यंत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाका, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

दरम्यान शहरात अजून ८०० अनधिकृत होर्डिंग असल्याचे आकडेवरीवरून स्पष्ट होत आहे

.कारवाईसाठी साहित्य अपुरे एकीकडे वरिष्ठ अधिकारी होर्डिंगवरील कारवाई गतीने करा, असे आदेश देत असले तरी दुसरीकडे आकाशचिन्ह विभागातर्फे पुरेशा प्रमाणात साहित्य पुरविले जात नाही. क्रेन उपलब्ध केला तरी एका पथकात गॅस कटर एक किंवा दोनच असतात.

मनुष्यबळ जास्त नसते. त्यामुळे आम्हाला कारवाईचा वेग वाढवता येत नाही. क्रेन आणि गॅस कटर पुरेशा प्रमाणात असतील तर दिवसात तीन-चार पेक्षा जास्त होर्डिंग काढू शकतो, असे एका क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी सांगितले.२८८ होर्डिंग झाले अधिकृत
अनधिकृत होर्डिंगमध्ये जे नियमानुसार अधिकृत होऊ शकतात त्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार २८८ होर्डिंग अधिकृत झाले आहेत. तर ९० प्रस्ताव फेटाळून लावले आहेत

. नव्याने मान्यतेसाठी ४३६ होर्डिंगचे प्रस्ताव आलेले आहेत. पण प्रस्ताव मान्य केले, तरी १५ दिवसांत चलनाची रक्कम न भरता अनेक व्यावसायिक होर्डिंगचा वापर करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत. याकडे परवाना निरीक्षकांचे दुर्लक्ष होत आहे

अनधिकृत होर्डिंग दृष्टिक्षेपात…
एकूण : २६११
कारवाई झालेले : ९६०
अधिकृत झालेले : २८८
रद्द झालेले प्रस्ताव : ९०
नवीन मान्यतेसाठी आलेले : ४३६
न्यायप्रविष्ट : १३
स्वतःहून काढून घेतलेले : २४
कारवाईसाठी प्रलंबित : ८००

Latest News