भारतीय विद्या भवनमध्ये ७ मे रोजी ‘ अनुभूती ‘ भरतनाट्यम सादरीकरण


भारतीय विद्या भवनमध्ये ७ मे रोजी ‘ अनुभूती ‘ भरतनाट्यम सादरीकरण
‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ अनुभूती ‘ या कार्यक्रमाचे ‘ ओजस, पुणे ‘ यांनी आयोजन केले आहे .
कार्यक्रमामध्ये डॉ. अपूर्वा जयरामन ( चेन्नई ) भरतनाट्यम नृत्यप्रकारात एकल ( सोलो ) सादरीकरण करणार आहेत
दि.७ मे २०२३ रोजी रविवार सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६४ वा कार्यक्रम आहे.