प्रतिमा उत्कट ‘ रंग कथा -२३ चित्रप्रदर्शनासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन.ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाकडून आयोजन


*’प्रतिमा उत्कट ‘ रंग कथा -२३* *चित्रप्रदर्शनासाठी**नाव नोंदणी करण्याचे आवाहन….ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाकडून आयोजन
पुणे :ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाच्या वतीने, ‘आर्टिस्ट कट्टा ‘ च्या सहकार्याने दि. ८ ते ११ जून दरम्यान ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी कलाकारांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. कलाकारांनी स्वतः केलेले ओरिजिनल पेंटींग, लॅण्डस्केप, पोट्रेट, वाईल्ड लाईफ,स्थिरचित्र, निसर्गचित्रासह सहभाग घेता येणार आहे.
दिनांक १५ मे पर्यंत https://forms.gle/oKMCZVCFeEjsqLYV7 गुगल फॉर्मवर नोंदणी करावी, किंवा ९५७९९००१२९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन मिलिंद संत, अस्मिता अत्रे , अमिता पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे केले आहे.‘प्रतिमा उत्कट – रंगकथा २३’ हे चित्रकला प्रदर्शन बालगंधर्व कलादालन पुणे येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे