SSC/HSC नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पोलिसांन कडून पर्दाफाश…

 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

नापास विद्यार्थ्यांना 30 ते 50 हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक प्रकार 2019 पासून सुरु होता शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दहावी, बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देऊन पास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

या प्रकरणातील उर्वरित सहा जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या आरोपींनी स्वायत्त संस्था असलेल्या maharashtra स्टेट ओपन स्कूल’ असं संकेतस्थळ तयार केलं होतं.

त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या टोळीचा पर्दाफाश केला आहे दहावी, बारावीसह इतर अभ्यासक्रमाच्या नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या बनावट ऑनलाईन संस्थेतून तब्बल 2700 विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे

.पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत संदीप ज्ञानदेव कांबळे या एजंटला pune स्वारगेट परिसरातून काही दिवसांपूर्वी अटक केलं होतं. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने त्याच्या इतर साथीदारांची नावे सांगितली.

त्यानंतर  सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम, कृष्णा सोनाजी गिरी आणि अल्ताफ शेख (रा.परांडा,जि.धाराशिव) या तिघांना अटक केली.प्राथमिक तपासात दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना पास झाल्याचे प्रमाणपत्र दिले असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून हा आकडा जवळपास 2700 वर पोहचला आहे. दरम्यान, या प्रकरणातील चारजणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे…

Latest News