महाराष्ट्राची सौंदर्यवती चा मुकुट सायली गायकवाड आणि आसावरी बोडस- कुलकर्णी यांनी पटकावला


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा महिलांचा आत्मविश्वास वाढविणारा उपक्रम
पिंपरी, पुणे महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३” पर्व ६ चे आयोजन करण्यात आले होते. आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये पुण्यातील सायली गायकवाड ( युवती गट) आणि आसावरी बोडस- कुलकर्णी ( सौभाग्यवती गट) यांनी प्रथम क्रमांकाचा मुकुट आणि रोख एकवीस हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय पारितोषिक विघ्नेशा गवारी (पुणे, दिघी) यांनी मुकुट आणि रोख सतरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक श्रद्धा मुळे (मुंबई) यांनी मुकुट आणि रोख पंधरा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक डॉ. रिंकू मोरे (पुणे), स्नेहा धुमाळे (अमरावती) आणि कावेरी तांबे (पिंपरी चिंचवड) यांना स्मृतिचिन्ह चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. परीक्षक म्हणून सोनाली पानसरे, तृप्ती पवार आणि गतविजेती फातिमा साबूवाला यांनी काम पाहिले. ग्रूमिंग नरेश फुलेलू आणि रागिनी मोराळे यांनी केली. वेशभूषा आणि केशरचना वैष्णवी सुतार यांनी केली. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध गायक संगीतकार ऋषिकेश बनसोडे उपस्थित होते.
स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजय जोगदंड, सूत्र संचालन आर. जे. बंड्या यांनी केले तर नितीन साळुंके आभार मानले. शिल्पा मगरे गाडेकर, वैशाली खंडागळे, राज जोगदंड, इशा रावल आणि क्षितिज गायकवाड यांनी संयोजनात सहभाग घेतला.
……………………………..