सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? पुणे जिल्ह्यातुन कोणाला संधी?


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पिंपरीतून भोसरीचे आमदार महेश लांडगे व राहुल कुल दौंडचे आमदार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात आहे.तर दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल हे देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे.
२०१४ मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या, तर २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातातसर्वोच्च न्यायालयातच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकार वाचले.
त्यानंतर आता राज्यातील सत्तांतरानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेकांच्या इच्छुकांच्याही आशाही पल्लवित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातुन कोणाला संधी मिळणार, यासंदर्भातही चर्चा सुरु झाल्या आहेत.
दुसरीकडे, पुण्यातून आतापर्यंत एकाही महिला आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. भाजप सरकार काळात माधुरी मिसाळ मंत्रिपदासाठी आग्रही होत्या. शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आणि फडणवीस यांचे समर्थक सिद्धार्थ शिरोळे यांचाही मंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकतो. तर जातीय समीकरणे जुळविण्यासाठी सुनील कांबळे यांच्याही नावाची चर्चा आहे
न्यायालयाच्या निर्णयानंतर आता येत्या काही दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहेत. विशेष म्हणजे आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही शहराला मंत्रीपद किंवा राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात सध्या २१ विधानसभा मतदारसंघांपैकी १२ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार आहेत.
तर उरलेल्या नऊ मतदारसंघात भाजपचे आमदार आहेतपुणे जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण, संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवाय नव्या मंत्रिमंडळात पुण्याला संधी मिळणार का? ‘या’ नावांची चर्चा ची असेल तर जिल्ह्याला मंत्रीपद द्यावे लागणार आहे