पिंपरी-चिंचवडची जनता भाजपच्या भ्रष्टाचारास विटली, येणार्या महापालिका निवडणुकीत ती भाजपला सत्तेतून हद्दपार करेल- अजित गव्हाणे NCP


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
राष्ट्रवादीच्या कामाचे श्रेय भाजपाने लाटावे हे दुर्देव आहे, असे गव्हाणे म्हणाले. नेहरूनगरची नविन शाळा, ग. दि. माडगुळकर सभागृह, तारांगण प्रकल्प, चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्प ही कामे राष्ट्रवादीच्या काळातच हाती घेण्यात आली होती. त्यांचे आज उद्घाटन करण्यात आले,याकडे त्यांनी लक्ष वेधले.तसेच उदघाटन आणि भुमीपूजन झालेल्या इतर अनेक कामांत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे ती बदनाम झाली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांची उदघाटने आणि भुमीपूजने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.१५)केली. त्यातील अनेक कामे ही राष्ट्रवादीच्या काळातील असल्याने त्यावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.जॅकवेलच्या कामात तीस कोटी रुपयांची लुट करण्यात आलेली आहे. त्याचे उद्घाटन करून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालत असल्याचाच संदेश फडणवीसांनी शहरवासियांना दिला असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी खोचक मागणी त्यांनी केली आहे.भाजपचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजारी असताना देखील त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना मुंबई येथे मतदान करण्याकरीता नेण्यातआले होते. त्याच जगतापां जॅकवेलच्या निविदेत 25 ते 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला करीत ही निविदा रद्द करण्याची पालिका आयुक्तांकडे केली होती. त्याच जॅकवेल कामाचे भूमीपूजन फडणवीसांनी केले नसते, तर जगतापांच्याआत्म्यास समाधान वाटले असते,असे गव्हाणे म्हणाले
कर्नाटकातील सुजाण जनतेने चाळीस टक्के कमीशन खाणारे भाजप सत्तेतून हद्दपार केले आहे.त्यामुळे त्यांचा जातीयवादी आणि भ्रष्ट चेहरा जनतेसमोर उघडा पडला. त्यातून देशामध्ये राजकीय वार्याची दिशा बदलण्यास सुरुवात झाल्याचे सांगत महाराष्ट्रात आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्ताबदल नक्कीच होईल.पिंपरी-चिंचवडची जनता भाजपच्या भ्रष्टाचारास विटली असून येणार्या महापालिका निवडणुकीत ती भाजपला सत्तेतून हद्दपार करेल, असा दावा अजित गव्हाणे यांनी केला आहे.आज भुमीपूजन आणि उदघाटन झालेल्या कामांचे श्रेय लाटता यावे म्हणून राष्ट्रवाादीच्या एकाही स्थानिक माजी नगरसेवकाला निमंत्रण देण्यात आले नाही, ही सुद्धा दुर्देवी बाब आहे, असे गव्हाणे म्हणाले.भ्रष्टाचारातून करण्यात आलेल्या या विकासकामांचे श्रेय लाटण्यापेक्षा महापालिकेतील भाजप नेत्यांची ठेकेदारी, भ्रष्टाचार आणि टक्केवारी बंद करा, अन्यथा येथील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेवटी गव्हाणेंनी दिला.