कर्नाटक निकालाबाबत भाकित खरे ठेवल्याचा सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा…


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
कर्नाटक निकालाबाबत भाकित खरे ठेवल्याचा असा दावा ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे केला आहे. ‘ज्योतिष ज्ञान’ या ज्योतिषाला वाहिलेले मासिक आहे . सिद्धेश्वर मारटकर हे या मासिकाचे संपादक आहेत. ‘ज्योतिष ज्ञान मासिक अंकातील जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ या आवृत्तीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत तसेच 2022 सालच्या दिवाळी अंकामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत वर्तवले होते . कर्नाटक मध्ये सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल काळ असून सत्तांतर होईल,असे निःसंदिग्ध पणे त्यांनी सांगितले होते .
‘ विद्यमान सरकारचा काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. न्यायालयाचा निकाल शिंदे-फडणवीस यांच्या बाजूने लागेल आणि निलंबनाबाबत चा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला जाईल’,असे भाकीत मारटकर यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वर्तवले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक बाबत ही दोन्ही भाकिते खरी ठरली आहेत,असे मारटकर यांनी सांगितले.