पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन ‘शिवनेरी’ नवा जिल्हा करा : आमदार लांडगे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
स्वतंत्र पोलीस आयुक्तायला मान्यता मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तार वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि ‘शिवनेरी’ हा नवा जिल्हा करावा व पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र्य तालुका म्हणून निर्मिती करावी. शास्तीकराचे ओझे सर्वाधिक माझ्यावर होते. कारण, लोक वारंवार विचारत होते. शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले? पण, देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर पूर्ण माफ केला. त्याचा आनंद सर्वाधिक झाला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ २०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल, मोशीत ८५० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येत आहे. शहराचा सर्वांगीण विकास होत असताना शहरातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये चमकावा. याकरिता कबड्डी आणि कुस्तीसारख्या पारंपरिक खेळांनाही प्रोत्साह द्यावे.


पथारीधारकांचे प्रश्न मार्गी लावा : खासदार श्रींरग बारणे
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, १९९९ मध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना तारांगण प्रकल्पाच्या उभारणीसाठी जर्मनीच्या कंपनीला काम दिले होते. मात्र, मी वेगळा पक्षाचा नगरसेवक होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती. त्यामुळे तत्कालीन नेत्यांनी तारांगण प्रकल्पाचे अर्थसंकल्पातून हेडच काढून टाकले. मात्र, ३२ वर्षांनंतर तारांगण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. २२ वर्षांपूर्वी मीच या प्रकल्पाचे काम सुरू झाले. भाजपाच्या काळातील चांगल्या कामांना आम्ही पाठिंबा दिला. अनेक प्रकल्प राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. पवना नदी सुधार प्रकल्प, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प मार्गी लागले पाहिजे. अशुद्ध पाण्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पवना प्रकल्प कार्यान्वयीत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शास्तीकर संपूर्ण माफ झाला, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, प्राधिकरण हद्दीतील लहान घरांना नियमिती करण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घ्यावा. साडेबारा टक्के परताव्याबाबत निर्णय घ्यावा. ‘स्मार्ट सिटी’च्या योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मिळत आहे. शहर आणि रस्ते प्रशस्त होत आहे. मात्र, शहरातील पथारीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांना न्याय देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. पुणे ते लोणावळा या भागातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याबाबत खासदार बारणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली.
*
‘मोस्ट लिव्हेबल सिटी’ घडवणार : आयुक्त शेखर सिंह
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, शहराची ओळख भारतातील सर्वाधिक गतीने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत. ‘कॉलिटी ऑफ लाईफ’ या हेतूने एकूण ८५६ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकर्पण होत आहे. पाणी प्रकल्पाचे विविध प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन-तीन वर्षांत पिंपरी-चिंचवड पाण्याच्या बाबतील स्वर्यंपूर्ण होईल. ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. यापुढे पीसीएमसीतील सर्व शाळांचे पीसीएमसी पब्लिक स्कूल असा प्रचार व प्रसार करण्यत येणार आहे. शहराच्या आरोगय क्षेत्रात ‘पिऱ्यामीड स्ट्रक्चर’ च्या सूत्रानुसार पुढाकार घेण्यात जाणार आहे. क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजनेंतर्गत ‘लाईट हाउस’ संकल्पना राबवली जाते. दिव्यांग नागरिकांसाठी ‘निरायमय वीमा आरोग्य योजना’ हाती घेतली आहे. शहरतातील मिळकतींचे सॅटेलाईट मॅपिंग होणार आहे. शहरातील ‘क्लिनेस्ट सिटी इन इंडिया’ म्हणून वाटचाल करण्याचे ध्येय आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प, सेंट्रल लायब्ररी, आयटीआयचा आधुनिक कॅम्पस, वाकड-भोसरी-चाकण अशी नवीन मेट्रो लाईन असे प्रकल्प हाती घेण्यात येतील. शहराला शहराला देशातील ‘मोस्ट लिव्हेबल सिटी’ घडवण्यासाठी आम्ही काम करित आहोत.

Latest News